‘या’ भारतीय व्यक्तीने चक्क नाकाने टायपिंग करत स्वतःचाच दोनदा मोडला रेकॉर्ड;पहा व्हिडीओ

0
3

टायपिंगच्या वेगाबाबत एका व्यक्तीचे आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. सामान्यतः सामान्य टायपिंग गती 40 शब्द प्रति मिनिट मानली जाते. पण यादरम्यान एखाद्या व्यक्तीचा टायपिंगचा वेग पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक भारतीय व्यक्ती हाताने नव्हे तर नाकाने टाइप करतो. सर्वात वेगवान टाईप करून या व्यक्तीने स्वतःचाच रेकॉर्ड दोनदा मोडला (Guinness World Record) आहे.

तिसऱ्यांदा मोडला विक्रम –

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या व्यक्तीच्या नावावर दोन विक्रम आहेत. आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्याचा विक्रम मोडण्यात यश आले. विनोद कुमार चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 44 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) नुसार, 44 वर्षीय विनोद कुमार चौधरी यांनी एकाच श्रेणीत तीनदा प्रवेश केला. त्याने 2023 मध्ये पहिल्यांदा 27.80 सेकंदात नाकाने टायपिंग करून विजेतेपद पटकावले होते. त्याच वर्षी, त्याने पुन्हा 26.73 सेकंदात टाईप करून दुसऱ्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब जिंकला. यावेळी चौधरीने अवघ्या 25.66 सेकंदात हा पराक्रम पूर्ण केला.
नाकाने लिहिलेले इंग्रजी अक्षर

GWR ने X वर एका व्हिडिओद्वारे हे शेअर केले आहे. क्लिपमध्ये तो नाकाने इंग्रजी अक्षरे टाइप करताना दिसत आहे. GWR ने पोस्टला कॅप्शन दिले ‘तुम्ही तुमच्या नाकाने (स्पेससह) वर्णमाला किती वेगाने टाइप करू शकता? विनोद कुमार यांनीही GWR मधून टायपिंग संदर्भात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, माझा व्यवसाय टायपिंगचा आहे, म्हणून मी त्यात रेकॉर्ड करण्याचा विचार केला, ज्यामध्ये माझी आवड देखील जिवंत राहू शकेल.

पहा व्हिडिओ –