रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘डॉन-३’ चित्रपटाची मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. साधारणत २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ हा चित्रपट सुद्धा चांगलाच गाजला. त्यानंतर या चित्रपटाचा सीक्वलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर ‘डॉन’चा तिसरा भाग कधी येणार याची गेली बरीच वर्षं प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अलिकडेच फरहान अख्तरने ‘डॉन ३’ची घोषणा केली आणि त्यानंतर सगळेच फार उत्सुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवी अपडेट समोर येत आहे. ‘डॉन-३’ मध्ये लीड कॅरेक्टर फायनल झाल्यानंतर खलनायक हे जाणून घेण्यास सिनेरसिक देखीस उत्सुक होते.
‘डॉन-३’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता विक्रांत मेस्सीला अॅकप्रोच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेत्याची खलनायकाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ‘डॉन-३’ मध्ये रणवीर सिंग आणि विक्रांत मेस्सीमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.