वारीत चोरांसा सुळसुळाट! मंगळसूत्र चोरताना महिलेला कसं पकडलं पाहाच; VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल

0
286

Wari 2025 video viral: आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली असून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये विसावल्या आहेत. दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आषाढी वारी पालखीमुळे मोठी गर्दी झाली होती. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उत्साहामध्ये पुणेकरांनी पालख्यांचे जोरदार स्वागत केले. यामध्ये मात्र चोरट्यांनी देखील हात साफ केले असल्याचे दिसून आले आहे.

 

यावेळी मोठ्या संख्येने जमणाऱ्या वारकरी व भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी उठवला. काही तासांत त्यांनी अनेक महिलांचे दागिने हिसकावले. पुरुषांची पाकिटे मारली. तर, वारकऱ्यांच्या बॅगा पळवल्या आहेत. महिला भाविक दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिने गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला चोरट्यांनी हिसकावल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक महिला वारकरी महिलेचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी या महिलेला पकडलं अन् पुढे काय घडलं तुम्हीच पाहा.

 

 

संत तुकाराम महाराज यांची देहूमधून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदीहून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते. दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी सहभागी होत असतात. यामध्ये अनेक माय माऊली देखील सहभागी होतात. तसेच पालखी पाहण्यासाठी देखील महिलांची मोठी गर्दी होत असते. याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माऊलींच्या पालखी सोहळ्यात प्रचंड गर्दी दिसत आहे. यावेळी सर्वजण पालखीचं दर्शन घेण्यासाठी धावपळ करत आहेत. याच गर्दीचा फायदे घेत एक महिला मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी पुण्यातल्या परिवर्तन अॅकेडमीच्या तरुण तरुणींनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलिसांकडून वारी सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पालखी मार्ग, विसावा ठिकाणांची आणि मुक्काम स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्था आणि विशेष पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here