
माणदेश एक्सप्रेस न्यूज : भारताने 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर केलं. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांच्या पतीची हत्या केली होती. या दहशतवादी कृत्याचा बदला म्हणून या प्रतिहल्ल्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं होतं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून 9 ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आले. पाकिस्तानात आतमध्ये खोलवर हे हल्ले करण्यात आले. भारताने एकाच हल्ल्यात सतत त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या प्रमुख दहशतवादी संघटनांची मुख्यालय नष्ट केली. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरच कुटुंब या हल्ल्यात संपलं.
भारताने पाकिस्तानवर केलेला हा प्रहार किती घातक होता, हे तिथल्याच एका माणसाकडून जाणून घ्या. “काल रात्री भारताने पाकिस्तानवर 24 मिसाईल डागले. हैराण करणारी बाब म्हणजे सर्व मिसाईलनी टार्गेटवर जाऊन हिट केलं. भारताने जे टार्गेट सेट केलेलं ते अचिव्ह केलं. यापेक्षा हैराण करणारी बाब म्हणजे पाकिस्तानच्या डिफेन्स सिस्टिमला एकाही मिसाईलला रोखण जमलं नाही” असं या पाकिस्तानी नागरिकाने सांगितलय.
View this post on Instagram