‘या’ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज होऊ शकतात बाद … तुम्ही काय केले…

0
1690

महाराष्ट्रातील महिलांमध्ये सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालये आणि सेतू केंद्रांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत. आता अर्ज भरल्या महिलांना झटका बसणार आहे. मराठी भाषेतून भरलेले अर्ज रद्द होणार आहे. शासनाच्या नव्या नियमाने महिलांची धावपळ उडत आहे. दरम्यान मनसेने काळया फिती लावून या प्रकाराचा निषेध केला आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत. यापूर्वी मराठीमध्ये अर्ज दाखल करण्यात आले. मात्र आता फक्त इंग्रजीमध्ये भरण्यात येणार अर्ज ग्राह्य धरणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

मराठी अर्ज का होणार बाद
अर्जांची छानणी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहे, त्या एजन्सीच्या सॉप्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे. मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे इंग्रजीतूनच भरले स्वीकारण्यात येणार आहे. जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील.

बुलढाण्यात पडसाद, मनसेकडून काळ्या फिती
लाडकी बहीण योजना पुन्हा वादात आली आहे. केवळ मराठी भाषेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. बुलढाण्यात मनसेने काळया फिती लावून निषेध केला आहे. अर्ज हे इंग्रजीतूनच भरले जावे जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याने महिलांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.

शिवसेनेकडून राज्यभरात मेळावे
एकीकडे लाडकी बहीण योजनेत अडचणी येत आहे. दुसरीकडे शिवसेने या योजनेचा प्रचार जोरात करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन “ताई, माई, अक्का” केला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ‘महिला वोट बॅक’ वर विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे.

सिल्लाडला पहिला मेळावा
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज हे शासनाकडे आले आहेत. या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात शिवसेनेचा पहिला महिला मेळावा सिल्लोडमध्ये उद्या होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या मेळाव्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा राज्यातील घराघरात पोहचण्याचा प्रयत्न आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here