भारतीय सिनेमाची जादू वर्षानुवर्षे प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. 2024 हे वर्षही काही खास घेऊन येत आहे. एकीकडे बॉलीवूडचे दिग्गज कलाकार आपल्या अप्रतिम कथानकांनी पडद्यावर आपल्या कलेची जादू दाखवायला सज्ज आहेत. तर दुसरीकडे दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार देखील हिंदी कलाकरांना तोडीसतोड देत आहेत. काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. पण प्रेक्षक काही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. चला अशा 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, जे 2024 मध्ये धमाल करायला तयार आहेत.
कल्कि 2898 इ.स
प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांचा हा सायन्स फिक्शन ॲक्शन सिनेमा आहे. हा चित्रपट एका भविष्याची कथा आहे. जिथे आपत्तीनंतर परिस्थीतीत एक माणूस मानवतेला वाचवण्यासाठी लढतो. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुष्पा 2
हा ब्लॉकबस्टर साऊथ चित्रपट पुष्पा: द राइजचा सिक्वेल आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. पुष्पा 2 या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले असून ते प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सिंघम अगेन
हा चित्रपट सिंघम फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. यात अजय देवगण आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आधी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता पण आता पुष्पा 2 सोबतचा संघर्ष वाचवण्यासाठी निर्मात्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफही या चित्रपटात दिसणार आहेत.
इंडियन 2
हा ॲक्शन ड्रामा चित्रपट 1996 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट इंडियनचा सिक्वेल आहे. यात कमल हसन मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट शंकर यांनी दिग्दर्शित केला आहे. अनेक वर्षांपासून या चित्रपटाची निर्मिती सुरू होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
वेलकम टू द जंगल
हा कॉमेडी चित्रपट जंगल सफारीवरील लोकांची कथा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि रवीना टंडन सारख्या अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या वेलकम चित्रपटाचा सिक्वेल आहे. अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपट 20 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या 5 चित्रपटांव्यतिरिक्त 2024 मध्ये इतर अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चित्रपट निर्माते सतत नवनवीन कथांवर चित्रपट तयार करत आहेत. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा हा संगम भारतीय चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल अशी अपेक्षा आहे.