ज्या शस्त्राने पाकिस्तानचे नाकेनऊ आणली, भारतीय सैन्याला मिळणार त्याचे अपग्रेडेड व्हर्जन

0
122

माणदेश एक्सप्रेस न्युज|नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या सामरिक ताकदीत लवकरच मोठी भर पडणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘पिनाका एमके-3’ या अपग्रेडेड मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरची चाचणी लवकरच घेण्यात येणार आहे. या शस्त्रामुळे भारताच्या क्षेपणास्त्र क्षमतेत मोठी वाढ होणार असून पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रूराष्ट्रांसाठी हा स्पष्ट इशारा मानला जात आहे.

 

पिनाका एमके-3 ची रेंज तब्बल 120 किमी असून त्यात 250 किलो वजनाचे वॉरहेड नेमकेपणाने लक्ष्य भेदण्यासाठी सक्षम असेल. या अत्याधुनिक यंत्रणेत लेझर गायरोंवर आधारित नेव्हिगेशन आणि मायक्रोस्ट्रिप अँटेना यांसारखी अत्याधुनिक प्रणाली बसवण्यात आली आहे. हे शस्त्र अवघ्या 44 सेकंदात 12 रॉकेट्स डागू शकते.

 

यापूर्वी पिनाका एमके-1 (रेंज 40 किमी) आणि एमके-2 (रेंज 60-90 किमी) हे व्हर्जन्स वापरले गेले असून, याच शस्त्राने पाकिस्तानवर झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ऑपरेशनद्वारे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

 

DRDO च्या सूत्रांनुसार, भविष्यात पिनाका रॉकेट लाँचरची रेंज 200 ते 300 किलोमीटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भारताच्या प्रतिउत्तर क्षमतेत आणखी वाढ होईल. भारताकडे आधीपासूनच अग्नि-5 आणि ब्रह्मोससारखी घातक क्षेपणास्त्रे आहेत. ब्रह्मोसची मारा क्षमता सुमारे 600 किमी, तर वेग ताशी 3700 किमी आहे. अग्नि-5 हे क्षेपणास्त्र 5000 ते 8000 किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. यामध्ये ‘MIRV’ (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे एका वेळी अनेक ठिकाणी हल्ला करण्यास सक्षम आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here