
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : सांगली जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांनी १३ व १४ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये ध्वजारोहणाबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिले असल्याची माहिती, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव यांनी दिली. दिनांक १३ व १४ या दोन दिवसांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ९ ते ९:३० दरम्यान आयोजित करावा, तसेच शाळेच्या नियमित वेळापत्रकात कोणताही बदल करायचा नसल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारे ध्वजारोहणाचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळ वाया जाणार नाही आणि कार्यक्रमही वेळेवर पूर्ण होईल.
यावेळी बोलताना यु.टी. जाधव म्हणाले, ध्वजारोहणामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढेल आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी मनोभावे भाग घेणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नियोजनबद्ध आणि वेळापत्रकानुसार ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.