समाजकल्याण विभागाचे कलंकित चेहरे! सपना घोळवे, दिपक पाटील नंतर नितीन उबाळे ; पुढचा नंबर कोणाचा?

0
237

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : समाजकल्याण खात्याच्या वतीने अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांचे म्हणावे व ठोस असे कोणतेही कल्याण झाले नाही. परंतु याच खात्याने मात्र अधिकाऱ्यांचे मोठे कल्याण केले आहे. त्यामुळे या खात्याचे नाव ‘अधिकाऱ्यांचे कल्याण करणारे खाते’ असे ठेवावे लागले. कारण सांगली जिल्ह्यात याच समाजकल्याण खात्याचे मागील वर्षी एक अधिकारी व एक निरीक्षक लाखखोरीत सापडले होते. बहुतेक त्यांचाच कित्ता गिरवत या वर्षी पुन्हा एकदा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे बचत गटाचे बिल काढून काढून देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत विभागाला रंगेहाथ सापडला. त्यामुळे हे खाते पुन्हा चर्चेत आले आहे.

 

समाजकल्याण खात्याऐवजी मधल्या काळात या खात्याचे नवा बदलून सामाजिक न्याय असे संबोधन करण्यात आले. परंतु यामुळे सामाजिक उतरंडीत मागे राहिलेल्यांना या खात्याकडून न्याय मिळाल्याचे ऐकीवात नाही. उलट या खात्यात काम करणाऱ्यांचे कसे कोटकल्याण होत आहे याचे सुरस किस्से ऐकायला मिळतात. त्यामध्ये आता नितीन उबाळे या अधिकाऱ्याने घेतलेल्या लाचेच्या घटनेची भर पडली आहे.

 

ही कारवाई झाल्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा झाली. मागील वर्षी शासनामार्फत भटक्या जमाती क प्रर्वगातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमांना नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या ५९,४०,००० हजार रुपयांच्या बिलासाठी तब्बल सहा लाख रुप्यान्चिया मागणी करून एक लाख रुपये घेताना तत्कालीन समाजकल्याण अधिकारी श्रीमती सपना सुखदेव घोळवे तर निरीक्षक दिपक भगवान पाटील अनुदानाचे चेक दिलेचा मोबदला म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडले होते.

 

गुरुवारी बचत गटाचे निविदेनुसार देयक अदा करण्यासाठी ४० हजारांची लाच घेत असताना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. विषेश म्हणजे उबाळे कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले.

 

शासकीय योजना आणि अनुदान मंजूर करण्याच्या बदल्यात उबाळे यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली. खात्रीशीर पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचून उबाळे यांना चक्क रोख रक्कम स्वीकारताना पकडले.

 

या घटनेनंतर समाजकल्याण विभागातील अनेक धुळखात असलेल्या फाईल्स आणि बंद दरवाज्यांमागील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांचा हक्काचा पैसा लाचखोरीत गाडला जातोय, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटली आहे. उबाळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here