मोड आलेले मूग खाण्याची योग्य वेळ आणि फायदे

0
268

Helthy Tips : मूग डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे मोड आलेले मूगही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पण अनेकांना मोड आलेले मूग खाण्याची योग्य वेळ माहीत नसते. तर जाणून घेऊयात त्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी

सकाळी नाश्त्याला मोड आलेले मूग किंवा इतर मोड आलेले कडधान्य खाणे खूप फायदेशीर असते. यामध्ये फायबर्स आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. सकाळी मूग खाल्ल्याने पचनक्रिया वाढते आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते. लिंबू आणि काळे मीठ घालून ते अधिक आरोग्यदायी बनवता येते.

 

व्यायाम करण्यापूर्वी

व्यायाम करण्यापूर्वी मोड आलेले मूग खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये जस्त आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. मूग खाल्ल्याने शरीराला आवश्यक उर्जा मिळते आणि शरीरातील स्टॅमिना वाढतो. त्यामुळे व्यायाम करताना लवकर थकवा येत नाही.

 

दुपारची छोटी भूक
भूक लागल्यावर किंवा काही हलके आणि आरोग्यदायी खाण्याची इच्छा असताना मोड आलेले मूग खाल्ले जाऊ शकतात. यामुळे मेटाबोलिझम नियंत्रणात राहतो आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी होते.

 

संध्याकाळचा नाश्ता
संध्याकाळी जंक फूडच्या जागी मोड आलेले मूग खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये टोमॅटो, काकडी, कांदा, लिंबू आणि चाट मसाला घालून तुम्ही स्प्राऊट्स चाट बनवू शकता. याची चव सर्व वयाच्या लोकांना आवडते.

 

कधी खाऊ नये?
रात्रीच्या वेळेस मोड आलेले मूग खाणे टाळावे. कारण यामध्ये फायबर्स आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि ते लवकर पचत नाहीत. त्यामुळे रात्री खाल्यास पोट फुगणे, गॅस आणि अॅरसिडिटीची समस्या होऊ लागतात. रात्री नेहमी पचायला हलके आणि पोषक अन्न खाणे उत्तम असते.

 

जर तुम्हाला रोजचं अॅसिडिटी आणि गॅसची समस्या असेल, तर मोड आलेले मूग खाणे टाळावे. मूग रिकाम्या पोटीही खाऊ नयेत. जे लोक डायटींगमध्ये फक्त फळे खातात, त्यांना संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच मूग खाणे चांगले असते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here