आपल्या 30 वर्षांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत शाहरुख खानने चित्रपट जगताला अनेक लोकप्रिय चित्रपट दिले. त्याचे चित्रपटसृष्टीमधील योगदान कौतुकास्पद आहे. शाहरुखला देशासह इतर अनेक देशांनीही विशेष सन्मान आणि पुरस्कार दिले आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या ग्रेविन ग्लासने शाहरुख खानच्या सन्मानार्थ खास सोन्याचे नाणे जारी केले आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. आता अशा परिस्थितीत फ्रान्समध्ये शाहरुख खानच्या नावाचे नाणे चलनात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 2018 मध्ये, शाहरुख खानच्या सन्मानार्थ, पॅरिसच्या प्रसिद्ध ग्रेविन संग्रहालयाने एक सोन्याचे नाणे जारी केले, ज्यामध्ये अभिनेत्याचे चित्र छापलेले आहे आणि त्याचे नाव देखील लिहिले आहे. शाहरुखच्या एका फॅन पेजने या नाण्याची झलक दाखवत हा विशेष सन्मान जाहीर केला होता.
पहा पोस्ट-
Paris' Grevin Museum honoured Shah Rukh Khan with customised gold coins. With this, the superstar has become the first actor to have gold coins in his name at the museum.
.
.#zoomtv #news #celebrtiynews #EntertainmentNews #trending #breakingnews #fyp #kingkhan #srk #shahrukhkhan… pic.twitter.com/tNr1Hq5mlz— Subash Chandra (@dasarisubash) July 24, 2024