
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरातील प्रतिष्ठीत ‘आटपाडी राजा’ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा मंडप पूजन सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. या सोहळ्याला गणेशभक्त, मंडळाचे कार्यकर्ते आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
मंडप पूजनाच्या या धार्मिक कार्यक्रमात प्रथम विधीवत पूजन करून श्री गणेशाच्या स्वागतासाठी मंडप सजावट उभारणीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. मंडळाकडून यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मंडळाचे प्रमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवानायक अनिलशेठ पाटील उपस्थित होते. गणेशोत्सव हे सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगत सर्व तरुणांनी सकारात्मक ऊर्जा सामाजिक कार्यासाठी वापरावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी लक्ष्मण कदम सर, विपुलशेठ कदम, फिरोज मुलाणी, दादासाहेब पाटील, यल्लापा पवार, नरेंद्र दिक्षीत, बंडू सरगर, स्वप्निल हाके, विकी दौंडे, संतोष बिराजदार, प्रशांत जाधव, दुर्योधन जावीर, सचिन आडसूळ, पंकज कलढोणे, गोपी पवार, मोहसीन वंजारी यांच्यासह इतर गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही सांस्कृतिक कार्यक्रम, व विविध सामाजिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते भाविकांना चोख सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आटपाडी शहरात ‘आटपाडी राजा’ मंडळाचा गणेशोत्सव हा भव्यतेसाठी ओळखला जात असून, यंदाही मंडळाचा उत्सव लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.