आळसंद श्रीनाथ सोसायटीवर महिला नेतृत्वाचा ठसा : अलका हारगुडे चेअरमन

0
103

माणदेश एक्सप्रेस न्यूज
विटा/प्रतिनिधी : 1950 नंतर पहिल्यांदाच आळसंद येथील श्रीनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन पदी महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. सौ. अलका शिवाजी हारगुडे यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमन पदी किसन जाधव यांची निवड झाली.

सौ.सोनिया (वाहिनी) सुहास बाबर यांनी आळसंद येथे नवनियुक्त चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना सौ. सोनिया वहिनी म्हणाल्या, सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एका महिला चेहऱ्याला चेअरमन पदाची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला. मी सगळ्या महिलांच्या वतीने सोसायटीचे मनापासून अभिनंदन करते.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमर जाधव, सरपंच अजित जाधव, मा. सरपंच हिम्मतराव जाधव, मा. सरपंच वाझर संजय जाधव, जगन्नाथ हारगुडे, सिताराम हारगुडे, नानासाहेब हारगुडे, लालासो हारगुडे,गुलाब शिरतोडे व सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

2021 मध्ये, पाणीदार आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या माध्यमातून सर्व संचालकांची बहुमताने निवड झाली होती. मागील एक वर्ष संपत जाधव यांची चेअरमन पदी तर किसन जाधव व्हा. चेअरमन पदी कार्यरत होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पुन्हा ही निवड पार पडली.

खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे कार्य उत्कृष्ट रीतीने रीतीने सुरू आहे. कै. आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संस्थेची निरंतर वाटचाल सुरू आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here