श्रध्दा कपूर आणि राजकूमार राव यांचा स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या हॉरर-कॉमेडीने 33 दिवसांत त्याच्या खर्चापेक्षा 915% अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर आता तो रोज नवा विक्रमही करत आहे. सोमवारी पाचव्या आठवड्यात या चित्रपटाने केवळ आमिर खानचा १५ वर्षांचा विक्रमच मोडला नाही तर शाहरुख खानच्या ‘जवान’लाही मोडीत काढले आहे.
स्त्री २ हा ६०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट बनणार आहे. पाचव्या आठवड्याच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी, रविवारी ६.८५ कोटी आणि सोमवारी ३.१७ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. एकूणच, आतापर्यंत या चित्रपटाने 583.35 कोटी रुपयांचा जबरदस्त व्यवसाय केला आहे.
‘स्त्री 2’ची बॉक्स ऑफिसवर कमाई
instagram.com/reel/DAAVjOwMp-w