‘नवरीनेच वरात गाजवली…’ नाचणाऱ्या घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नाद लागतो ओ..”

0
280

लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी घोड्यावर बसून जबरदस्त डान्स करताना दिसतेय.

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवरी लग्नात घोड्यावर बसली असून यावेळी गाण्याच्या तालावर नवरी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. शिवाय यावेळी नवरीला ज्या घोड्यावर बसवण्यात आलं आहे त्या घोड्यालादेखील नाचवलं जात आहे. नवरीचा हा डान्स पाहून आजूबाजूला असलेले इतर लोकही तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

 

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘नक्कीच घोडेवाल्याची पोरगी असणार’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘नाद लागतो….कोणाचंपण काम नाय’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘नवरी शेतकऱ्याची कन्या असेल म्हणून घोड्यावर बसून डान्स करतेय’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘नवरीला मानलं आपण, एवढं सोप्प नाही हे. शेतकऱ्याची वाघीण दिसते.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here