64 वर्षांच्या हिरोचा जलवा; हादरवून सोडलं बॉक्स ऑफिस; 2025 ची पहिली ब्लॉकबस्टर ठरली ‘ही’ फिल्म

0
151

नव्या वर्षाचा दुसरा महिना सुरू झाला आणि 2025 वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला आहे. यापूर्वी ‘पुष्पा 2’नं 2024 सोबतच 2025 वर्षही गाजवलं. पण अखेर पुष्पाचं वादळ क्षमलं असून 64 वर्षांच्या अभिनेत्याच्या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन आठवड्यांत या चित्रपटानं त्याच्या भांडवलापेक्षा तब्बल 6 पटींनी जास्त कमाई करून इतिहास रचला आहे. आतापर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 300 कोटींची कमाई केली आहे.

 

 

हा चित्रपट साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबातीचा तेलुगू चित्रपट ‘संक्रान्तिकी वास्तुनम’ आहे. या तेलगु चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं इतिहास रचला आहे. केवळ देशातच नाहीतर, परदेशातही ‘संक्रान्तिकी वास्तुनम’ मोठ्या थाटात कमाई करत आहे.

 

 

सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती यांचा तेलुगू चित्रपट ‘संक्रान्तिकी वास्तुनम’ नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं इतिहास रचला आहे. केवळ देशातच नाही तर, परदेशातही ‘संक्रान्तिकी वास्तुनम’ची कीर्ती पसरत आहे. 2025 सालचा हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचं सिद्ध झालं आहे, हे आश्चर्यकारक आहे. अवघ्या तीन आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शननं 300 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे.

 

 

वेंकटेशचा ‘संक्रान्तिकी वस्थुनम’ गेल्या महिन्यात 14 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा एक अॅ’क्शनपॅक्ड चित्रपट आहे, ज्यामध्ये कॉमेडीचा चांगला डोसही प्रेक्षकांना मिळतो. या चित्रपटाच्या कथेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि म्हणूनच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 20 दिवसांत या चित्रपटानं जगभरात 303 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

 

 

‘संक्रान्तिकी वास्तुनम’ची कहाणी एक लग्न झालेल्या जोडप्याच्या अवतीभोवती फिरते. हे जोडपं आपलं आयुष्य अगदी आनंदात जगत असतं. पण, ट्वीस्ट तेव्हा येतो, जेव्हा हिरोची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा त्याच्या आयुष्यात येते. त्यानंतर आनंदानं आयुष्य जगणाऱ्या जोडप्याचं संपूर्ण आयुष्य उलट-सुलट होतं. फिल्ममध्ये 64 वर्षांच्या वेंकटेंशचे जबरदस्त अॅक्शन सीन्सही पाहायला मिळतात.

 

 

दरम्यान, ‘संक्रान्तिकी वास्तुनम’चे दिग्दर्शक अनिल आहेत. यामध्ये व्यंकटेश यांच्याव्यतिरिक्त मीनाक्षी चौधरी, ऐश्वर्या राजेश, उपेंद्र लिमये, साई कुमार आणि वीटीवी गणेश यांसारखे सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. थिएटरनंतर, हा चित्रपट लवकरच ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here