“ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले

0
389

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पूर्वी ट्रक किंवा मालवाहू जड वाहनांच्या मागे लिहिलेला संदेश अनेकांचे लक्ष खेचून घेत असे. अनेकदा सुविचारांसह सामाजिक जागृती करण्याचे काम या संदेशातून केले जात असे. हा ट्रेंड हळूहळू चारचाकी वाहनांपर्यंत आला. अशाच एका पुण्यातील एका टेम्पोच्या मागे लिहलेला मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र यावेळी पुणेकरांनी या पाटीवर कुणाचा अपमान नाही केला तर स्वत:चीच बाजू मांडली आहे.

 

 

ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं.

 

त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका टेम्पोच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय गाडीच्या मागे? तर या पठ्ठ्यानं आपल्या गाडीच्या मागे, “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला? कसं सांगू तिला की गाडी पुढं काही सुचत नाही मला” हा मेसेज वाचून सगळेच रस्त्यानं नक्की हसत असणार. दरम्यान याद्वारेच या गाडी मालकाचं आपल्या गाडीवरील प्रेम पाहायला मिळालं.