राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे आमनेसामने, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, धक्काबुकी आणि हाणामारी

0
317

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळल्याची  घटना घडली. या घटनेनंतर राज्यात सर्वसामान्य जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला. जनतेसह विरोधकांनी ही राजकारण्यांना चांगलच धारेवर धरलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच एकमेकांचे कट्टर विरोधक असणार ठाकरे आणि राणे  आमनेसामने आले. त्यामुळे मालवणमध्ये सध्या तणावाचं वातावरण पहायला मिळालं. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तेथे घोषणाबाजी, धक्काबुकी आणि नंतर हाणामारी ही झाली.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज आदित्य ठाकरे हे घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक होते. पाहणी करत असतानाच तेथे नारायण राणे, निलेश राणे आले. त्यानंतर तेथे मोठा राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या आंगावर धावून गेले.

महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकसुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

हा राडा सुरू असतानाच आदित्य ठाकरेसुद्धा तेथे पोहोचले. त्यांना पाहून पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न झाला. त्याशिवाय, किल्यावर जाण्यापासू त्यांची अडवणूकहू झाली. त्यानंतर वैभव नाईक यांनी पुढे येत सर्वांना प्रतियुत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते. त्यादरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.