टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा; ‘या’ दोन युवा खेळाडूंना संधी

0
278

माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई – आयपीएल 2025 च्या उत्साहात देश गुंतलेला असताना, बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-19 संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या संघात दोन युवा खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे – मराठमोळा आयुष म्हात्रे आणि आयपीएलमध्ये चमक दाखवणारा वैभव सूर्यवंशी.

 

बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या संघात आयुष म्हात्रेला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर वैभव सूर्यवंशीला महत्त्वाची भूमिका दिली गेली आहे. भारताचा अंडर-19 संघ इंग्लंड दौऱ्यावर 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात 24 जून रोजी सराव सामन्याने होणार असून, 27 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.

 

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –
24 जून: सराव सामना
27 जून: पहिला एकदिवसीय सामना
30 जून: दुसरा एकदिवसीय सामना
2 जुलै: तिसरा एकदिवसीय सामना
5 जुलै: चौथा एकदिवसीय सामना
7 जुलै: पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना

 

कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
12 ते 15 जुलै: पहिला कसोटी सामना
20 ते 23 जुलै: दुसरा कसोटी सामना

 

या दौऱ्यात भारतीय संघ नव्या दमाच्या खेळाडूंनी सज्ज असून, त्यांच्या प्रदर्शनाकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहणार आहे. मराठी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे आयुष म्हात्रे या युवा खेळाडूच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

 

कर्णधार: आयुष म्हात्रे
मुख्य खेळाडू: वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार/विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर.एस. अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, युद्धजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.

 

भारतीय अंडर-19 संघाला या दौऱ्यात चांगली कामगिरी करून भविष्याच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. मराठमोळ्या खेळाडूंनी दिलेल्या विश्वासावर खरा उतरावं, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here