मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर टॅक, ट्रॅंकर आणि कारची धडक, एकाचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी

0
226

 

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताची मालिका काही थांबेना. शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन वाहनांची एकमेकांना धडक लागली. अपघातात एका व्यक्तीने जीव गमावला. तर दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात भाताण बोगद्याजवळ ट्रक, ट्रॅंकर आणि कार या तीन वाहनांमध्ये घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास भाताण बोगद्याजवळ टॅक, ट्रॅंकर आणि कारची धडक लागल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. देवेंद्र सिंग राजपूत असं मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन जखमी तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सुरज कुदळे आणि अक्षय पाटील असं जखमी झालेल्या तरुणांची नावे आहे.

 

या अपघातात तिन्ही वाहने चक्काचूर झाले आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलिस या संदर्भात चौकशी करत आहे. पोलिसांनी अपघातात मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर सतत होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.