टी20 वर्ल्डकप 2026 चं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना

0
256

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, क्रिकेटप्रेमींना सर्वाधिक उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना १४ जून रोजी एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे.

 

ही स्पर्धा १२ जून २०२६ पासून इंग्लंडमध्ये सुरू होणार असून, ५ जुलै २०२६ रोजी प्रतिष्ठेचा अंतिम सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे. एकूण १२ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेतील १० संघ निश्चित असून, उर्वरित २ संघ पात्रता फेरीतून निवडले जातील.

 

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना गट १ मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसह दोन पात्रता फेरीतील संघ देखील असतील. तर गट २ मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दोन पात्र संघांचा समावेश आहे.

 

स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने ३० जून आणि २ जुलै रोजी होणार असून, अंतिम सामना ५ जुलैला लॉर्ड्सवर खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गटातील फक्त एकच सामना होणार असला, तरी दोन्ही संघ उपांत्य फेरी गाठल्यास ते पुन्हा एकदा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.

 

टी-२० वर्ल्डकप २०२६ महत्त्वाचे टप्पे :

स्पर्धा सुरुवात : १२ जून २०२६

भारत-पाकिस्तान सामना : १४ जून २०२६, एजबॅस्टन

उपांत्य फेरी : ३० जून आणि २ जुलै २०२६

अंतिम सामना : ५ जुलै २०२६, लॉर्ड्स

 

 

टी20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

शुक्रवार 12  जून: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, एजबॅस्टन

शनिवार 13 जून: क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

शनिवार 13 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

शनिवार 13 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, हॅम्पशायर बाऊल

रविवार 14 जून: क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर, एजबॅस्टन

रविवार 14 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन

मंगळवार 16 जून: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, हॅम्पशायर बाऊल

मंगळवार 16 जून: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल

बुधवार 17 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले

बुधवार 17 जून: भारत विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले

बुधवार 17 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन

गुरुवार 18 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले

शुक्रवार 19 जून: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल

शनिवार 19 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल

शनिवार 19 जून: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल

शनिवार 20 जून: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले

रविवार 21 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

रविवार 21 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

मंगळवार 23 जून: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

मंगळवार 23 जून: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

मंगळवार 23 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, हेडिंग्ले

बुधवार 24 जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

गुरुवार 25 जून: भारत विरुद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

गुरुवार 25 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

शुक्रवार 26 जून: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

शनिवार 27 जून: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

शनिवार 27 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

शनिवार 27 जून: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, द ओव्हल

रविवार 28 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

 

 

या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना हाय व्होल्टेज सामन्यांचा अनुभव मिळणार असून, भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here