चारित्र्यावर संशय; पतीकडून पत्नीचा दगडाने ठेचून खून

0
299

माणदेश एक्स्प्रेस न्यूज/पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आंदर मावळातील कोंडिवडे या गावात शुक्रवारी घडली. याबाबत महिलेच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी अशोक बारकू वाघमारे (रा. कातकरी वस्ती, कोंडिवडे ता. मावळ) याला वडगाव पोलिसांनी अटक केली. सोनाबाई वाघमारे (३३, रा. कोंडिवडे, ता. मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

 

वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेवर संशय घेऊन शिवीगाळ करत मारहाण करीत असे, आरोपी पती व आपल्या पत्नीसह शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मौजे कोंडिवडे येथे मासेमारी करण्यासाठी जात होते. तेथे आरोपी पतीने पत्नीवर संशय घेऊन तिच्या डोक्यात तसेच कपाळावर दगडाने मारहाण करून तिला ठार मारले. सहायक पोलिस निरीक्षक शीतल कुमार डोईजड हे पुढील तपास करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here