वजन कमी करण्यासाठी जेव्हा लोक हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात आधी आहारातून साखर हटवतात. जितकं होईल तितकं कमी कमी साखरेचं सेवन करतात. साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाहीत तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळतात.
वजन कमी करण्यासाठी साखर उत्तम की गूळ असा प्रश्न अनेकांना पडतो. साखर आणि गूळ या दोन्हींमध्ये गोडवा असतो.साखर खालल्यानं शरीराला जास्त कॅलरीज मिळतात ज्यामुळे वजन वाढू लागते. साखरेमुळे लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. ज्यामुळे हार्ट डिसिज,कॅन्सर, टाईप २ डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अधिक साखर खाल्ल्यांन दात किडतात.याशिवाय लिव्हरच्या समस्यांचा धोका असतो. जास्त साखर खाल्ल्यानं शरीरात कोलेजन फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही.
१०० ग्रॅम गुळात जवळपास ३८५ कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढू शकते. गुळ साखरेपेक्षा उत्तम ठरतो. पण गुळाच्या सेवनानंही शुगर लेव्हल वाढू शकते. काही लोकांमध्ये एलर्जीचं कारण ठरू शकते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे सेवन केल्यानं शरीरात गरमी वाढते. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते ऊन्हाळ्यात पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
गूळ एक सुपरफूड आहे. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.गुळात आयर्न असते ज्यामुळे एनिमियाची समस्या दूर होते. हाडं मजबूत होतात. यात पचन एंजाईम्स असतात ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.गुळाच्या सेवनानं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येतं. गुळानं इम्यून सिस्टिम मजबूत राहते.
गूळ आणि साखर दोन्हींचा स्त्रोत ऊस हाच असतो.दोन्ही बनवण्याची प्रोसेस वेगवेगळी असते. गूळ एक नैसर्गिक स्विटनर आहे. जो कमीत कमी प्रोसेसमध्ये तयार केला जातो. यात साखरेच्या तुलनेत व्हिटामीन्स, खनिजं जास्त असतात. तर साखर बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. याशिवाय यात कॅलरीज खूप जास्त असतात.
गूळ तयार करताना ऊसाच्या रसातील अनेक पोषक तत्व घातले जातात. साखरयुक्त उत्पादनांचे अत्याधिक सेवन वाढवल्यास डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात. याशिवाय उसापासून तयार झालेल प्रोडक्ट्स आहारात समाविष्ट केल्यानं व्यक्तीला लाभदायक फायदे मिळू शकतात.