दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी फ्रॉन्स येथील श्री मणिका विनायकर अलमय मंदिरात गणेश उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. फ्रॉन्समध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. पॅरिसमधील गणेश मंदीर हे भारतीय नागरिकांसाठी किंवा तेथे स्थायिक झालेल्यांसाठी एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे. फ्रॉन्स शहरात गणेशोत्सवाच्या सणाला विशेष महत्त्वाचे प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी पॅरिस येथील चॅपेल जिल्ह्यात गणेश उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक पार पडणार आहे. श्री मणिका विनयाकर अलयम मंदिर हे फ्रान्समधील सर्वात मोठे हिंदू देवताचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जातो. ही भव्य मिरवणूक पाहण्यासाठी फ्रान्स शहरात वास्तवास असलेले अनेक हिंदू समाजाचे लोक उपस्थित राहतात.
असा साजरा केला जातो गणेशोत्सव
मिरवणूकी दरम्यान नृत्याच्या माध्यमातून उपस्थित गणेश भक्त गणरायाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करतात. ताला-सुरात गाणरायाची गाणी गातात. मिरवणूकीच्या वेळीस उपस्थितांना भक्तांना प्रसाद स्वरूपात गणरायाचा आशिर्वाद दिला जातो. गणेश मूर्ती समोर नारळ फोडले जातात. ही प्रथा जूनी आहे. दरवर्षी या उत्सवाला फ्रॉन्समध्ये नागरिक उपस्थित राहतात आणि गणेशोत्वसाचा आनंद घेतात.