
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे दिघंची हायस्कूल दिघंची व रं.मि.कलाल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दिघंचीचे वरिष्ठ लिपिक सुभाष शंकर लांडगे यांचा सेवावृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे सचिव एच.यु पवार प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने, पर्यवेक्षक बाळासाहेब पिलवे, दिघंची गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एम साळुंखे यांच्या हस्ते श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर सेवा गौरव समारंभामध्ये सुभाष लांडगे परिवाराला आंब्याचे रोप, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव एच.यु पवार सर यांच्या हस्ते व निरिक्षक ए.बी चौगुले, संस्थेचे ऑडिटर श्री वंजारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सत्कारमुर्ती सुभाष लांडगे म्हणाले, मी माझे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. मला संस्थेने ही खुप सहकार्य केले. माझ्या जीवनात मी यशस्वी झालो. तर संस्थेचे सचिव व कार्यकमाचे अध्यक्ष एच.यु पवार म्हणाले, सुभाष लांडगे यांनी आपल्या शांत व संयमी स्वभावामुळे त्यांच्यावर संस्थेने टाकलेली जबाबदारी निस्वार्थी, प्रामाणिकपणे पार पाडली. यावेळी मुख्याध्यापक मुख्याध्यापक जितेंद्र माने देखील मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.डी. चांडवले, आभार कुमार नळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी दोन्ही प्रशालेतील सर्वशिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनींच्या उपस्थित होते.