ओढा रुंदीकरणामुळे जलसंधारणाला चालना मिळेल : ब्रम्हदेव पडळकर

0
483

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : ओढ्याच्या संवर्धनासाठी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने खोलीकरण, सफाई आणि रुंदीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल, जलसंधारणाला चालना मिळेल आणि स्थानिक पर्यावरण सुधारण्यास मदत होईल असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, झरेचे सरपंच अंकुश पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप खिलारी उपस्थितीत होते.

 

 

 

झरे नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने ओढा खोलीकरण, रुंदीकर्ण व सफाई कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी ब्रम्हदेव पडळकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, या कार्यामुळे ओढ्यामध्ये वाहून येणाऱ्या गाळाची सफाई होऊन पाणी प्रवाह सुरळीत होईल. तसेच, रुंदीकरणामुळे पुराच्या धोक्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार आहे, यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढून पिण्याच्या व शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुधारेल.

 

 

याप्रसंगी उपसरपंच प्रकाश सुळे, मुन्ना चव्हाण, कैलास वाघमारे, दादा भानुसे, बिरा बरकडे, जितेंद्र भानुसे, संकेत भानुसे, दत्ता चव्हाण, शरद घोरपडे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here