
Health Care Tips : सध्या पावसाळा सुरू आहे. या ऋतूमध्ये अनेक हंगामी आजार होण्याची शक्यता असते. तर या दिवसांमध्ये आरोग्याची अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे उचित आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि त्यांचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
अदरक आणि मध हे शतकानुशतके अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे. आयुर्वेदातही यांचा वापर मोठ्याप्रमाणावर होत असतो. तसेच रोज स्वयंपाक करताना अदरकचा वापर केला जातो. कारण अदरकमध्ये असलेले जिंजरॉल नावाचे संयुग आणि मधात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. अदरक आणि मध एकत्र खाल्ल्याने पावसाळ्यात तुम्हाला कोणते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
अदरक आणि मध एकत्र खाल्ल्याने आरोग्यास मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
पचन सुधारते
अदरक आणि मध एकत्र खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. मधामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पचन सुधारण्याचे काम करतात. तुम्ही जर दररोज त्यांचे सेवन केले तर बद्धकोष्ठता, आम्लता आणि पोटफुगी यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो
पावसाळ्यात थंड हवामानामुळे बऱ्याचदा लोकांना सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यां सारख्या सतावत असतात. तर अशावेळेस तुम्ही अदरकच्या रसात मध टाकून सेवन केल्यास लगेच आराम मिळू शकतो. कारण आल्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म घशाची जळजळ कमी करतात. याशिवाय, मध घशातील जळजळ कमी करते. यामुळे खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
दम्यामध्ये देखील हे फायदेशीर आहे.
अदरक आणि मध हे दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर मानले जातात. ते दम्याला चालना देण्यास प्रतिबंध करते. याशिवाय फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका कमी करते. दिवसातून तीन वेळा अदरक आणि मधाचे सेवन करू शकता.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे खूप महत्वाचे आहे. अशावेळेस अदरक आणि मध खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. तर अदरक आणि मध हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काम करतात.
वजन कमी होते
पावसाळ्यात पाऊस पडतो त्यामुळे लोक जिममध्ये किंवा बाहेर चालायला जाऊ शकत नाहीत. तर या दिवसांमध्ये तुम्ही अदरक आणि मधाचे सेवन करून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित ठेवू शकता. आले आणि मधामध्ये असे घटक असतात जे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.
सेवन कसे करावे?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अदरक आणि मध कसे सेवन करावे? तर तुम्हाला आल्याच्या रसात मध मिक्स करून त्याचे सेवन करावे लागेल. तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी देखील घेऊ शकता. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)