आषाढी वारी निमित्त विशेष बस सेवा; फुकटया प्रवाशांना बसणार लगाम!

0
10

आषाढी वारी  निमित्त पंढरपूर येते श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन आणि पंढरपूर यात्रेसाठी जमणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आषाढी यात्रेसाठी तब्बल 5 हजार विशेष बस (MSRTC Special Bus Service for Pandharpur) सोडणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने तशी योजना आखली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून वारीची तयारीही सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षीचे विशेष असेकी, जर गावातील 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी, वारकऱ्यांनी एकत्रित पद्धतीने मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस (ST Bus) उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा घेण्यासाठी प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

आषाढी यात्रा काळातही मोफत प्रवास सेवा उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आषाढी वारी काळात दिल्या जाणाऱ्या महामंडळ प्रवासी सेवेत देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

फुकटया प्रवाशांना लगाम
दरम्यान, यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे, अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत.

तात्पूरर्ती बस स्थानकांची उभारणी

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात

येणार आहेत. वारकरी भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ

नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग

(आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात

येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय

आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक…. अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून

जास्तीत जास्त भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी

महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बस स्थानकाचे नाव

 चंद्रभागा बसस्थानक
 भिमा यात्रा देगाव
 विठ्ठल कारखाना
 पांडुरंग बसस्थानक
जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

छत्रपती संभाजी नगर, नागपूर व अमरावती प्रदेश

नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

एक्स पोस्ट

वाहतूकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशा

वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा टाळण्यासाठी पोलीस

प्रशासनाच्या खांदयाला खांदा लावून 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे, असेही महामंडळाच्या पत्रकात म्हटले आहे.