साउथ सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा चाहत्यांनी दिला थिएटरमध्येच बकऱ्याचा बळी!

0
223

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाच्या प्रिमियरवेळेस झालेलं चेंगराचेंगरीचं प्रकरण आणि त्यात झालेल्या एका महिलेचा मृत्यू हे दुर्दैवी प्रकरण ताजं असतानाच आणखी एक विचित्र प्रकार उघड झालाय. साउथ सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा ‘डाकू महाराज’ सिनेमा पाहायला आलेल्या चाहत्यांनी थिएटरमध्ये जीवंत बकरा कापल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

 

‘डाकू महाराज’ सिनेमा पाहायला नंदमुरी बालकृष्ण यांचे चाहते गेले होते. तिरुपती येथील प्रताप थिएटरमध्ये हे चाहते आनंदात सिनेमा पाहायला गेले. त्यावेळी चाहत्यांनी एका बकऱ्याच्या मानेवर चाकू ठेऊन थिएटरमध्ये त्याचा बळी दिला. याशिवाय या चाहत्यांनी उत्साहात सिनेमाच्या पोस्टरवरही बकऱ्याचं रक्त शिंपडलं. पेटा इंडियाने याची दखल घेतली असून या पाच माथेफिरु चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.