
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील प्रकाश तुकाराम विभुते (वय ७०) यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या ४५००० रुपये किंमतीच्या सहा सोलर प्लेटा अज्ञात चोरट्यांनी गायब केल्या.
सदरची घटना ही शनिवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ ते रविवार दि. १३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत प्रकाश विभूते यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.