
Animal Viral Video: जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी. अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप सतर्क राहावं लागतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आयुष्याचा अर्थ कळेल. जर जगायचं असेल तर कोणालाही न घाबरता लढावंच लागतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, काळवीटच्या अंगावर धावून जाणं सिंहाला चांगलंच महागात पडलंय. व्हिडीओमध्ये काळवीट आणि सिंह समोरा समोर आलेले दिसतायत. पाण्यात असलेला काळवीट तितक्याच हिंमतीने आणि जिद्दीने सिंहाला सामोरं जाताना दिसतोय. सिंह जवळ येताच काळवीट शिंगांनी सिंहावर हल्ला करायला जातो आणि हे पाहून सिंह दोन पावलं मागेच सरकतो. काळवीटाची ही हिंमतीची चाल सिंहावर भारी पडलेली दिसली आणि सिंह मागे सरकला. म्हणून संकट कोणतंही आलं तर न घाबरता सामोरं गेलं पाहिजे.
तसंच “प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे, पण मृत्यूला घाबरू नका तर त्याला सामोरे जायला शिका” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सामोरे जा आणि दोन दिवस लवकर मरा”, तर दुसऱ्याने “जो मृत्यूला घाबरत नाही, तो कोणासमोरही लढू शकतो” अशी कमेंट केली. तर एकाने “कधीही वेळ बदलू शकते, म्हणून जास्त गर्व करू नये” अशी कमेंट केली.