‘पापा की परी’वर मुलाचा निरागस सवाल, उत्तर ऐकून थक्क व्हाल!

0
207

Viral Video: सोशल मीडियावर सतत तरुणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच एका तरुणाने मुलीला असा काही प्रश्न विचारला की त्याला वाटले ती चुकीचं उत्तर देईल, जसं नेहमी व्हायरल मीम्समध्ये होते. या व्हिडीओला ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

आजकाल रिल्सचा जमाना आहे. अनेकजण भर रस्त्यात प्रश्न विचारताना दिसतात आणि रिल्स शूट करतात. हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांना लाखो व्ह्यूज मिळताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओने सर्वांना चकित केले आहे. खरंतर, एका तरुणाने ‘पापा की परी’ समजून एका मुलीला प्रश्न विचारला, पण तिचं उत्तर ऐकून त्याने डोक्यालाच हात लावला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी खूप मजा घेत आहेत.

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण गार्डनमध्ये फिरत असतो. तो तेथून जाणाऱ्या दोन मुलींना थांबवून प्रश्न विचारतो, तुम्ही जर एका दुकानात गेलात. तेथून तुम्ही ५ किलो बटाटे विकत घेतले आणि मग दुसऱ्या दुकानात गेलात. तेथे ५ किलो समोसे विकत घेतले. तर मला सांगा, यापैकी सर्वात जास्त जड काय असेल? तरुणाला वाटले की मुलगी काहीतरी भलतेच उत्तर देईल, जसे नेहमी व्हायरल मीम्समध्ये दिसतं. पण या मुलीचं उत्तर ऐकून सर्वांनीच डोक्याला हात लावला आहे.

 

मुलीने त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटले की, समोसा. यावर तरुण लगेच म्हणतो, अरे… तुला हेही माहीत नाही की दोन्हीचं वजन ५ किलो होते ते. यावर मुलीने असा युक्तिवाद केला की तरुणासह हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनीही डोक्याला हात लावला आहे. मुलगी पूर्ण आत्मविश्वासाने त्या मुलाला म्हणते की, तुला हे माहीत नाही की समोस्यासोबत चटणीही मिळते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक मीम्स देखील शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये त्या मुलीने केबीसीमधील 7 कोटी जिंकल्याचे म्हटले आहे. तसेच व्हिडीओवर वाह दीदी वाह! असे लिहिण्यात आले आहे.

 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर एक युजरने लिहिलं, पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीला डोकं वापरताना पाहिले आहे. दुसऱ्या एका यूजरने म्हटले की, काहीही म्हणा, पण मुलीने तर बरोबरच सांगितले आहे. एका महिला युजरने मजेशीरपणे कमेंट केली आहे की, संपूर्ण स्त्री समाजाची इज्जत राखली. एका युजरने तर असेही म्हटले की, दिदीने तर भाईची बोलतीच बंद केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mubassir Raza (@mubassir039)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here