
उन्हाळ्यामध्ये गरमीच्या त्रासाने प्रत्येकजण त्रस्त झाल्याने थंड हवेसाठी एसीमध्ये राहणं पसंत केलं. मात्र एसीमध्ये राहणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.
तुम्ही ऑफिसमध्ये एसीच्या थंड हवेत तासनतास बसता, त्यानंतर बाहेर पडल्यावर त्याचा परिणाम तुमच्या थेट मेंदूवर होतो.
शरीराच्या तापमानामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. अशावेळी मेंदूचं कार्य बिघडतं. कारण मेदू अचानक वातावरणात होणाऱ्या बदलांसोबत जुळवून घेऊ शकत नाही.
मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही आणि रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या नसा खराब होतात. मोठ्या प्रमाणात हा बदल झालाच तर मेंदूतील नसांवर दाब येऊन त्या फुटूही शकतात.
मेंदूमध्ये रक्तस्त्राव जास्त झाला आणि वेळेवर कोणतेही उपचार नाही मिळाले तर मृत्यूचाही धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे अचानक बाहेर पडत असाल तर काळजी घ्या आणि बाहेर पडा.