श्रेयश अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसली कंबर!

0
141

नव्या वर्षात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीतील पराभवासह आयसीसीची ट्रॉफी उंचावण्याची संधी हुकली. कसोटीतील दुःख विसरून टीम इंडिया वनडेतील आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीला लागलीये. मिनी वर्ल्ड कप स्पर्धा म्हणून ओळखली जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ कसा असेल? कोण संघात टिकून राहिल? कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला कमबॅकची संधी मिळणार याची चर्चा जोर धरू लागलीये.

 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत ज्याला संधी मिळेल, तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाचा भाग असणार हे जवळपास निश्चित आहे.
टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात आघाडीवर नाव आहे ते आयपीएल चॅम्पियन कॅप्टनच. तो भारतीय खेळाडू म्हणजे श्रेयश अय्यर. टीम इंडियातून बाहेर पडल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कंबर कसून केलेल्या मेहनतीच फळं त्याला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतच मिळणार आहे, अशी चर्चा आहे.

 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. १२ जानेवारीपर्यंत या स्पर्धेसाठी संघ ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील स्टार खेळाडू असलेल्या श्रेयश अय्यरनं ५ वेगवेगळ्या देशांतर्गत स्पर्धेत आपला जलवा दाखवून देत १३४१ धावा कुटल्या आहेत. या कामगिरीसह त्याने टीम इंडियातील कमबॅकची आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच कमबॅक पक्क मानले जात आहे.