रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO

0
306

ढोलकीच्या तालावर तुम्ही अनेक लावणी सादर केलेल्या पाहिल्या असतील. ढोलकीवर थाप पडताच प्रत्येकाचे पाय थिरकू लागतात आणि ‘वाह’ असे उद्गार तोंडावाटे निघतात. अगदी सामान्य माणसांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत प्रत्येकालाच ढोलकीचे वेड असते. काळजाला भिडणारे हे एकमेव वाद्य आहे. कारण- ढोलकी क्षणात प्रत्येकाच्या मनात आनंदलहरी निर्माण करते. तर आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ (Video) पाहून तुम्हीसुद्धा थिरकायला लागाल एवढे नक्की.

 

व्हायरल व्हिडीओनुसार हा व्हिडीओ (Video) गावात शूट करण्यात आला आहे. कारण – एका बैलगाडीत काही तरुण मंडळी आणि एक आजोबा बसल्याचे दिसत आहे. तरुण मंडळींमधील एक मुलगा ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ हे गाणे गाण्यास सुरुवात करतो. पण, इथेच एक ट्विट येतो. कारण- तरुण मंडळींबरोबर उपस्थित आजोबा ढोलकी वाजवण्यास सुरुवात करतात आणि या गाण्याला महाराष्ट्रीयन किंवा मराठी तडका देतात. रोमँटिक गाण्याला कशा प्रकारे ढोलकीची साथ मिळाली आहे ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

 

 

व्हायरल व्हिडीओत, तरुण ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ हे गाणे गाण्यास सुरुवात करतो. या गाण्याची प्रत्येक ओळ आणि त्यावर ढोलकीची थाप तुम्हाला संगीताचा एक वेगळाच अनुभव देईल. तसेच नक्की या सादरीकरणावर रडायचे की नाचायचे अशी संभ्रमावस्था निर्माण करील. कारण – एकीकडे नकळत प्रियकर-प्रेयसीच्या आठवण करून देणारे ‘तुम ही हो गाणे’ आणि दुसरीकडे पाय थिरकायला भाग पडणारी ढोलकी तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडेल.

 

व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. ‘भावाने मिसळबरोबर जिलेबी फाफडा दिला आहे, भावूक व्हायचे की नाचायचे आहे, काय मस्त ढोलकी वाजवली… १ नंबर, आता जेव्हापण हे गाणे ऐकेन तेव्हा मला ही धून आठवेल’ आदी अनेक कौतुकास्पद कमेंट्स केल्याचे दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here