चीनबाबत धडकी भरवणारा अहवाल, भारत संकटात? ; अमेरिकेच्या रिपोर्टनंतर जगभरात खळबळ

0
512

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेसचे कमांडर जनरल अँथनी कॉटन यांनी केलेल्या दाव्यानंतर जगभरात खळबळ माजली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला 2027 पर्यंत तैवान ताब्यात घेण्यासाठी सज्ज राहण्याचे थेट आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या खुलाशानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि सुरक्षा व्यवस्थेत मोठे हलचल सुरू झाले आहे. भारतासाठीही ही परिस्थिती गंभीर ठरू शकते, कारण एकीकडे भारत-अमेरिका यांच्यात टॅरिफवरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे चीन भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे.


चीनचा अण्वस्त्र साठा वाढतोय

अमेरिकेच्या अहवालानुसार, चीन सतत आपल्या अण्वस्त्रांचा साठा वाढवत आहे. बुलेटिन ऑफ द अ‍ॅटोमिक सायंटिस्ट्सच्या माहितीनुसार, चीनकडे सध्या 600 अण्वस्त्रे आहेत. याशिवाय 350 नवीन क्षेपणास्त्र सायलो आणि मोबाईल लाँचर बेस निर्माण केले गेले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) कडे तब्बल 712 ग्राउंड मिसाईल लाँचर असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या सर्व घडामोडींमुळे चीन जगासाठी मोठे संकट ठरू शकतो. कारण ही शस्त्रे केवळ जमिनीवरूनच नव्हे तर समुद्रातून आणि आकाशातूनही डागता येतात. म्हणजेच चीनकडे तीनही दिशांनी हल्ला करण्याची क्षमता आहे.


‘नो फर्स्ट युज’ धोरणावर शंका

बीजिंगकडून वारंवार असा दावा केला जातो की ते ‘नो फर्स्ट युज’ धोरण कायम ठेवतील. म्हणजे चीन कोणत्याही परिस्थितीत सर्वप्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. तसेच, अण्वस्त्रे नसलेल्या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

मात्र, चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात याच्या उलट विधान केले गेले. अहवालात स्पष्टपणे नमूद आहे की, जर युद्धात पराभव होण्याची शक्यता दिसली तर अण्वस्त्रांचा पहिला वापर केला जाईल. त्यामुळे चीनच्या धोरणांबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.


भारतासाठी वाढते संकट

भारतासाठी या घडामोडी अधिक चिंताजनक आहेत. चीनने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानसोबत आपले संबंध अधिक दृढ केले आहेत. अलीकडेच चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिघांच्या संयुक्त बैठकीत पाकिस्तानने भारतावर थेट आरोप केले की, “भारताकडून सतत त्रास दिला जात आहे.” या बैठकीत दहशतवादाविरुद्ध लढण्याचे नाटक करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात चीन-पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोका वाढवणारी आहे.

भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही वर्षांत सीमावादांमुळे आधीच तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशा स्थितीत चीनकडून अण्वस्त्रांचा साठा वाढवला जाणे आणि आक्रमक धोरण अवलंबले जाणे भारताच्या सुरक्षेसाठी थेट संकट ठरू शकते.


2027 पर्यंत जगासाठी धोका?

अमेरिकन कमांडर अँथनी कॉटन यांच्या मते, चीनने 2027 पर्यंत आपले सैन्य आणि अण्वस्त्र क्षमता एवढी वाढवली आहे की, त्याद्वारे तो कोणत्याही देशाला उद्ध्वस्त करू शकतो. यामुळे आशिया खंडात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि भारत, जपान तसेच तैवान यांच्यासाठी हे विशेष धोकादायक ठरू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here