धक्कादायक! मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये आढळला छुपा कॅमेरा, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

0
454

 

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेराआढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ कथीतरित्या विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियातून व्हायरल झाला. ज्यामुळे कॅम्पसमध्ये आणखी तणाव वाढला असून, प्रशासन आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांना शांततेचे अवाहन करण्यात आल्याचे समजते.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात वसतिगृहाच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचे एका मुलीला आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. घडलेली घटना समजताच विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. घडल्या प्रकारामुळे महाविद्यालयातील सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल गंभीर चिंता निर्माण होत आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी त्वरित कारवाई आणि न्यायाची मागणी केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा
प्ररसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ कथितपणे मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये सामायिक केले गेले. ज्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. घटनेची माहिती पसरताच, विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमा झाले, त्यांनी रात्रभर निदर्शने केली आणि जबाबदारीची निश्चित करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस इंजिनीअरिंग कॉलेज कॅम्पसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. गुप्त कॅमेऱ्याच्या संदर्भात अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप तरी कोणाला अटक करण्यात आली नाही. या घटनेशी संबंधित सर्व व्यक्तींना अटक करून त्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी पीडित विद्यार्थ्यांची मागणी आहे.

पहा पोस्ट: