धक्कादायक! 5 वर्षाच्या मुलाने शाळेत नेली बंदुक; तिसरीचा विद्यार्थी गोळीबारात जखमी

0
177

बिहार मध्ये 5 वर्षाच्या मुलाने शाळेत दप्तरामधून गन घेऊन जात दुसर्याा विद्यार्थ्यावर त्याच्यामधून गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये 8 वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. हा हल्ला शाळेमध्येच झाला आहे. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील शाळेमधील ही घटना आहे. त्रिवेणीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत ही घटना घडली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक (SP) शैशव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 च्या सुमारास असेंम्बली दरम्यान मुलं एकत्र असताना हा प्रकार घडला आहे.

जखमी विद्यार्थी तिसरी इयत्तेमधील आहे. या विद्यार्थ्याच्या हाताला जखम झाली आहे. सध्या त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही. सध्या पोलिस बंदुक कोणी चालवली? ती कोणाची आहे आणि फायरिंग कसं झालं याचा तपास घेत आहेत.

या घटनेनंतर मोठ्या संख्येने पालक आणि आजुबाजूचे रहिवासी शाळेत जमा झाले आणि शाळेच्या आवारात आणि बाहेर एकच गोंधळ उडाला. SP शैशव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हा गोंधळ शांत करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गोळी झाडली गेलेली बंदुक परवानाधारक शस्त्र आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही सखोल तपास करू. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चिंता निर्माण झाली आहे. शाळा प्रशासनावरही कारवाई केली जाईल, त्यानुसार सुरक्षेतील त्रुटी दूर केल्या जातील. अशी प्रतिक्रिया एसपी यादव यांनी दिली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here