माणदेश एक्सप्रेस न्युज :तासगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील बहुउदेदशीय सेवाभावी संस्था यांच्या सयुंक्त विद्यमाने तासगांवात सलग आकराव्या वर्षी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन आज तासगांव सांगली रोडवर दत्तमंदिर दत्तमाळ या ठिकाणी या शिवार कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजक महेश खराडे यांनी दिली.
याबाबत आयोजक महेश खराडे म्हणाले, सलग दहा वर्षे मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादा नंतर व शेतकरी वर्गातुन होत असलेली मागणी डोळ्यासमोर ठेवून यावर्षी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रर्दशनात देशी विदेशी कंपण्याचे सुमारे दोनशेहून अधिक स्टाँल असणार आहेत. यामध्ये कृषी साहित्य, अवजारे, ट्रक्टर, ठिबक, किटकनाशके, दुचाकी, चारचाकी वाहने आदिसह ग्राहकोउपयोगी सर्व वस्तुचे स्टाँल उपलब्ध आहेत. येथे सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे.
प्रर्दशनात शुक्रवारी 20 रोजी सकाळी 10 वाजता डाँगशो चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 21 रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शनाचे आयोजन केले असुन यामध्ये देशी गाय, म्हैस, बैल जर्शी गाय आदिचे प्रदर्शन आहे. प्रदर्शनात खवैय्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. तसेच लहान मुलासाठी अमुझमेन्ट पार्क आहे. तरी सदर प्रदर्शन पाहण्यासाठी एक दिवस राखून ठेवा तुम्ही या इतरांना सांगा असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे.