
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी :
शिवाजी पॉलिटेक्निक,आटपाडी या महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनां निमित्त शिक्षक दिन तसेच नुतून प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्सहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री तानाजीराव पाटील बी.एड महाविद्यालायचे प्रा. अभिजित गिरी हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राधाकृष्णन यांचा आदर्श घेण्याचा व आपल्या ज्ञानाची भूक वाढवण्याची व तसेच नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक वृत्ती जोपासण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. ओंकार कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना आपण विकसित भारत घडविण्याची महत्वाची भूमिका बजवावी. यावेळी उपप्राचार्य श्री. रोहित पवार सर तसेच प्रा. श्री. शिवदास टिंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्री.साजिद तांबोळी तर आभार प्रदर्शन प्रा. श्री. प्रशांत गोंजारी सर यांनी मानले. तर सूत्रसंचालन कु. राधिका साळुंखे व अनुष्का खटके यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.