पहा महाराष्ट्रात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा कोणाला मिळणार फायदा? पात्रता निकष काय?

0
281

महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रवाशांना 30 हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. यामध्ये सामान्य आणि गोर गरीब कुटुंबातील नागरिकांना अनेकांना आर्थिक परिस्थिती नसल्याने किंवा पुरेशी माहिती नसल्याने धार्मिक स्थळी जाता येत नाही. आता ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ वयोवृद्धांचं हे स्वप्न पूर्ण करणार आहे यामधून राज्यातील ज्येष्ठांचे आशिर्वाद सरकारला मिळतील अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ चे पात्रता निकष

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक
वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक
कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावं.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ साठी आवश्यक कागदपत्रं कोणती?
आधार कार्ड/ रेशनकार्ड
महाराष्ट्रात राहत असल्याचं अधिवास प्रमाणपत्र
पासपोर्ट साईझ फोटो
सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र
जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
वैद्यकीय प्रमाणपत्र

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ साठी अपात्र कोण?
कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत
सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.
विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असलेल्यांचे कुटुंब ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेले (बी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग ). प्रवास करणार्यााला संसर्गजन्य रोग असल्यास तो वैद्यकीय कारणावर अपात्र होईल.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.