
माणदेश एक्सप्रेस न्युज/बिजापूर– नक्षलवाद्यांच्या तडाख्याला सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा मोठा झडपा दिला आहे. छत्तीसगडमधील बिजापूर आणि अबूझमाड परिसरात आज सकाळपासून सुरू असलेल्या तीव्र चकमकीत आतापर्यंत २६ नक्षली ठार झाले आहेत. सुरक्षा दलांच्या धडाकेबाज कारवाईमुळे नक्षलवादी संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
या चकमकीत नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस वसावा राजू यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वसावा राजू हा दंडकारण्यातील एक जुना वयोवृद्ध नक्षली नेता होता आणि त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस सरकारने ठेवले होते. तो माड परिसरात लपलेला होता आणि नक्षलवादी चळवळीच्या सुरुवातीपासूनच सक्रिय होता.
बिजापूर, नारायणपूर आणि दंतेवाडा येथील डीआरजी जवानांनी नक्षलवाद्यांच्या प्रमुख अड्ड्यावर घातलेला हा हल्ला मोठ्या यशस्वी कारवाईत बदलल्याचे दिसत आहे. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार करत नक्षलवाद्यांना घेराव घातला असून, चकमकी अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे नक्षलवादी संघटनेवर मोठा दडपशाहीचा परिणाम होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.