
माणदेश एक्आसप्टरेस न्पायूज | आटपाडी | प्रतिनिधी
सांगली जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच नियुक्ती झालेल्या विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ आटपाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. 13 जुलै 2025 रोजी 12.30 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन, आटपाडी येथे हा समारंभ पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती सामाजिक संघटना, दलित महासंघ, मुस्लिम संघटना आणि आटपाडी तालुक्यातील विविध सामाजिक व प्रबोधनात्मक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सत्कार समारंभात जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त झालेल्या सात मान्यवरांचा सन्मान केला जाणार असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात येणार आहे.
▪️ मा. समित दादा कदम – सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रदेशाध्यक्ष, जनसुराज्य पार्टी, ▪️ मा. डॉ. तात्यासाहेब गायकवाड – प्रदेशाध्यक्ष, लोकहितवादी पार्टी. यांना फ्रान्सच्या केनेडी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेली आहे. ▪️ मा. राजेंद्र (बापू) खरात – जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सांगली; तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य ▪️ मा. तानाजी पाटील – जिल्हा नियोजन समिती सदस्य व संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
▪️ मा. सम्राट महाडिक – जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष, ▪️ मा. अमोल दादा बाबर – संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुहास भैया बाबर, आमदार – खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघ हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ▪️ अँड. मंदार जोशी – महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, ब्राह्मण आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ▪️ मा. विशाल दादा पाटील – खासदार, सांगली लोकसभा मतदारसंघ
▪️ मा. अरुण (भाऊ) वाघमारे – संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी हे असणार आहे.
या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय भिन्न विचारसरणीचे असलेले विविध पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन जिल्ह्याच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचा सन्मान करत आहेत. यामध्ये बहुजन, मुस्लिम, दलित, ब्राह्मण आणि इतर समाजघटकांच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने सामाजिक एकतेचा आणि समावेशी नेतृत्वाचा सकारात्मक संदेश दिला जात आहे.
सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन
हा समारंभ हा फक्त सत्काराचा कार्यक्रम नसून, पुढील सामाजिक संवादाला चालना देणारा मंच ठरणार आहे. त्यामुळे सर्व सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदरचा कार्यक्रम हा आज रविवार दिनांक १३ जुलै दुपारी १२.३० वा. संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.