मुंबई महापालिका निवडणुकीवरून संजय राऊतांचे स्फोटक वक्तव्य; सरकारला थेट आव्हान

0
76

माणदेश एक्स्प्रेस न्यूज| मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत थेट निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचे आव्हान दिले आहे.

 

“विधानसभा निवडणुका ज्या पद्धतीने जिंकल्या, त्यावरून सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर छी थू झाली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या गेल्या. आता मुंबई महापालिकेचंही तेच चित्र उभं करायचा प्रयत्न सुरू आहे, पण मुंबईकर आणि मराठी माणूस हे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत,” असा कडक इशारा राऊत यांनी दिला.

 

राऊत पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी धमक्या देतात, निधी देण्याच्या अफवा पसरवतात, कायद्याचा गैरवापर करतात. ही निवडणूक फक्त भाजपची नसून लोकशाहीची आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊनच तारीखा ठरल्या पाहिजेत.” ते पुढे म्हणाले, “फडणवीस आणि शिंदे यांच्या गाड्यांतून पैसे वाटले जातात. माजी नगरसेवकांना बॅगा टेकवल्या जातात. हा पैशांचा खेळ आहे, लोकशाही नाही. हे नेते म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. सरकार बदललं, की मुंगळे दुसऱ्या ढेपेला जातील. यांच्याकडे १०० निष्ठावंत कार्यकर्तेही नाहीत.”

 

राऊत यांनी भाजप सरकारची तुलना ‘ईस्ट इंडिया कंपनी’शी केली. “हे सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे पार्टनर आहेत. मुंबई जिंकून ती अमित शहा व व्यापार्यांपच्या पायाशी अर्पण करायची आहे,” असा आरोप करत त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “मला मत दिलं तर निधी देतो’ हे विधान संविधानाशी प्रतारणा करणारे आहे. जे सरकार लोकशाहीत धमक्या देऊन सत्ता मिळवते, ते संविधानविरोधी आहे. यांचा स्वतःचा मनुवादी संविधान आहे,” असा घणाघातही त्यांनी केला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here