संजय राऊतांचा संपादकीय इशारा! भुजबळांच्या पुनर्नियुक्तीवर राजकीय वर्तुळात खळबळ

0
101

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काही महिन्यांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज होते. आता त्यांच्या पुनर्नियुक्तीने नाशिक आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

 

 

मात्र, भुजबळांच्या शपथविधीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक आणि बोचरा ट्वीट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भुजबळ यांचा एकत्र फोटो शेअर करत “फडणवीस, मिंधे… भुजबळांच्या मांडीचे काय करणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. यासोबतच उद्याचं संपादकीय “जळजळीत आणि खणखणीत” असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, भुजबळांच्या पुनर्नियुक्तीवर माणिकराव कोकाटे यांनी स्वागत केलं आहे. “माझ्यात आणि भुजबळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत,” असं ते म्हणाले. तसेच भुजबळ मंत्री झाल्याने नाशिक व महाराष्ट्राला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारणातले हे नवे समीकरण आणि संजय राऊतांच्या उद्याच्या संपादकीयमुळे राज्याच्या राजकीय रंगमंचावर नवा ट्विस्ट येणार, यात शंका नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here