
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सांगली या बँकने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये 5 कोटी 03 लाख इतका ढोबळ नफा मिळविलेला आहे. बँकेच्या एकूण 18 शाखांपैकी प्रधान कार्यालयासह सर्व शाखा नफ्यामध्ये आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बँकेने 1000 कोटी व्यवसायाचे ध्येय समोर ठेवून वर्षा अखेरपर्यंत बँकेने व्यवसायाचा 985 कोटींचा टप्पा पार केला आहे. बँकेच्या व्यवसायामध्ये सतत वाढ होत आहे. असे स्पष्ट करून बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असलेची माहिती बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.
३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या एकूण ठेवी 578.21 कोटी इतक्या ठेवी झाल्या आहेत. बँकेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घटकांना कर्ज पुरवठा केलेला असून माहे मार्च २०२५ अखेर बॅंकेकडील एकूण 407.67 कोटी इतक्या रक्कमेचा कर्ज पुरवठा केला असून बँकची एकूण गुंतवणूक 241.24 कोटी इतकी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करत बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये नेत्रदिपक प्रगती साध्य केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सी.आर.ए.आर. किमान ९ टक्के असने बंधनकारक असताना आपले बँकेचा सी.आर.ए.आर. 17.69 टक्के इतका भक्कम आहे. आर्थिक वर्षाखेरीस बँकेचे ग्रॉस एनपीए प्रमाण 5.11 टक्के इतके असून यावर्षी बँकने निव्वळ एनपीए प्रमाण 1.74 टक्के राखलेले आहे.
आजपर्यंत संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करुन बँकेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा पार केलेला आहे. या मोलाच्या सहकार्याबाबत अध्यक्ष यांनी बँकचे सर्व समासद, ठेवीदार, कर्जदार व बँकचे हितचिंतक या सर्वांचे आभार व्यक्त केले. पुढेही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा चेअरमन विनायक शिंदे यांनी व्यक्त केली.
बँके आर्थिक सेवांसोबतच सामाजिक बांधीलकी जपण्याचाही सतत प्रयत्न करीत असते. बँकेने सभासदाचे मृत्यु झालेस त्यांच्या कुटुंबीयानां तातडीचे मदत रु. 25 हजार त्वरित देत आहे. तसेच निष्कर्जी सभासदाचे मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबीयानां रु, 7 लाखाची मदत देत आहे. तसेच एन.पी.एस. धारक शिक्षक सभासदांचे वारसास वरील मदतीच्या नियमापेक्षा रु. 2 लाख अतिरिक्त मदत दिली जाते. शिवाय कर्जदार सभासदांचे मृत्यु झालेस त्यांचे कर्जाचे रु. 25 लाखा पर्यंतचे कर्जास सुट देत आहे.
आर्थिक वर्षात प्रतिवर्षी बँकेतर्फे सभासद असलेल्या आदर्श शिक्षकांची सत्कार करणेत येतो व कर्मवीर भाउराव पाटील (आण्णा), क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार व पूर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती धाकराकांना तसेच नवोदय प्रवेश, सैनिक स्कूल प्रवेश, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी, एन.डी.ए. परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानां पुरस्कार देण्यात येतो, तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडुंचा व सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. बँकेने अनेक सामाजिक सेवांमध्येही वेळोवेळी आपला सहभाग नोंदविलेला असल्याचे विनायक शिंदे म्हणाले.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन अनिता काटे, संचालक रुपाली गुरव, शामगोडां पाटील, धनाजी घाडगे, संजय महिंद, अशोक घागरे, शिवाजी जाधव, फत्तु नदाफ, नितिन चव्हाण, अजितराव पाटील, गांधी चौगुले, शब्बीर तांबोळी, शरद चव्हाण, संतोष जगताप, अमोल शिंदे, मिलन नागणे, राहूल पाटणे, अमोल माने, श्रीकांत पवार, श्रीमंत पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी लाड, मॅनेजर महांतेश इटंगी व असि. मॅनेजर संतोष पाटील, धोंडीराम पाटील, नागराज मानेव अकौंटंट पंडित पाटील तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कर्ज योजना नव्याने सुरु
1) अल्प मुदत जामीनकी कर्ज रु. 10 लाख 9 टक्के व्याज दर 60 हप्ते (हप्ते 20800 X60)
2) सोलर खरेदी कर्ज रु, 5 लाख लाख 9 टक्के व्याज दर 60 हप्ते
3) वाहन खरेदी कर्ज रु. किमतीनुसार 9 टक्के व्याज दर 60 हप्ते
4) सोनेतारण कर्ज प्रती तोळ्यास कर्ज रु. 55 हजार 9 टक्के व्याज दर
मोबाईल बँकिंग सेवा लवकरच सुरु
चेअरमन विनायक शिंदे म्हणाले, बँकेने मोबाईल बँकिंग सेवा सुरु करणेस मंजुरी मिळणे साठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविणेत आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर लवकरच मोबाईल बँकिंग सेवा सुरु करीत आहोत.