दारू साठी पैसे न दिल्याने एकाचा खून, मुलाचे नाव आल्याने आईने केली आत्महत्या

0
302

माणदेश एक्सप्रेस न्युज/कवठेमहांकाळ – दारू प्यायला पैसे न दिल्याच्या वादातून कुकटोळी गावात एका व्यक्तीचा खून झाला असून, या प्रकरणी संशयित मुलाचे नाव समोर येताच त्याच्या आईने आत्महत्या केली.

 

अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर (वय ४०, रा. कुकटोळी) यांचा रविवार १८ मे रोजी संध्याकाळी अचानक काही माहिती न देता घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सोमवारी दुपारी गावातील हायस्कूलच्या मागील भागात त्यांना जखमी अवस्थेत आढळले. मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

 

कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासणीमध्ये अजित यांच्या चुलत भाऊ स्वप्नील तानाजी क्षीरसागर (वय २७) व सुशांत शंकर शेजुळ (वय २५, रा. कुकटोळी) यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी कबुली दिली की, अजित यांनी दारू प्यायला पैसे दिले नसल्याने वाद निर्माण झाला, ज्यात स्वप्नीलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर सुशांतने डोक्यात दगड घातला.

 

खुनाच्या या प्रकरणी सुशांत याचे नाव समोर येताच, त्याच्या आई विमल शंकर शेजुळ (वय ४३) याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतचे वडील लहानपणी मृत्युमुखी पडल्याने तो एकटा होता आणि मुलाचे गुन्ह्यात नाव आल्याचा धक्का त्याच्या आईला सहन झाला नाही.

 

या प्रकरणाची पुढील तपासणी कवठेमहांकाळ पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here