![मावरा](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/02/मावरा.png)
‘सनम तेरी कसम’ सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमातील हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन या जोडीचं चांगलंच कौतुक झालं. दोघांची केमिस्ट्री सर्वांना आवडली. सिनेमातील सरु आणि इंदर या दोघांच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. सिनेमात सरुची भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मावरा होकेनने लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मावराने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत लग्न केलंय.
‘सनम तेरी कसम’ सिनेमातील सरुच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मावरा होकेनने काल लग्नाचे फोटो पोस्ट करुन सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिलाय. मावराने अमीर गिलानीसोबत लग्न केलंय. या लग्नाला मावरा आणि अमीर यांचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. मावराने अत्यंत थाटामाटात अमीरसोबत लग्न केलंय. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी मावराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मावराने लग्नाचे फोटो शेअर करुन त्याखाली कॅप्शन लिहिलंय की, “आजूबाजूला असलेल्या सर्व गोंधळामध्ये मी तुला अखेर मिळवलंच.” मावरा आणि अमीरची लव्हस्टोरी मालिकांच्या सेटवर जुळली असल्याचं समजतंय. ‘सबात’ आणि ‘नीम’ यांसारख्या मालिकांमध्ये मावरा आणि अमीरने एकत्र काम केलं होतं. दरम्यान मावराची भूमिका असलेला ‘सनम तेरी कसम’ सिनेमा शुक्रवारी ७ फेब्रुवारीला पुन्हा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा सीक्वल अर्थात ‘सनम तेरी कसम २’चं सध्या काम सुरु आहे.