
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट काल ३० मार्चला ईदच्या निमित्ताने सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘भारत’ आणि ‘टायगर-३’ चित्रपटानंतर जवळपास दीड वर्षानंतर अभिनेता रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या सिनेमात सलमान खानसह साऊथ सुंदरी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे ईदच्या लागोपाठ सुट्ट्या असल्याने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यात आता ‘सिकंदर’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘सिकंदर’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. सिकंदरने भारतात पहिल्या दिवशी २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं दिसतंय. परंतु या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
साधारण २०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे. तसेच येत्या आठवड्यात चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.