
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅरलिटी शोंपैकी एक असलेला सलमान खानचा बिग बॉस १९ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या शोचे १८ यशस्वी सीझन्स पार पडले असून, प्रेक्षकांमध्ये १९व्या पर्वाची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या सीझनचा प्रीमियर ३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी काही वृत्तांमध्ये प्रीमियरची तारीख १९ जुलै असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बिग बॉस १९ यंदा अधिक काळ चालणार असल्याची चर्चा असून, शोमध्ये यावेळी कोणताही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर किंवा युट्यूबर दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. शोची थीम यावेळी पारंपरिक ठेवण्यात येणार असून, एका सीक्रेट खोलीतून निवडक स्पर्धक घरातील घडामोडींवर नजर ठेवतील, अशी संकल्पना आहे.
विशेष म्हणजे, यंदा एविक्शन केवळ प्रेक्षकांच्या मतदानावर आधारित असेल. कोणतेही टास्कवर आधारित एविक्शन होणार नाही. स्पर्धकांना मिळणाऱ्या किराणा सामानाची व्यवस्था टास्कद्वारे केली जाणार आहे.
स्पर्धकांच्या यादीत डेझी शाह, तनुश्री दत्ता, फैजल शेख उर्फ फैजू, खुशी दुबे, विक्रम सिंह चौहान, राम कपूर, शशांक व्यास आणि लक्ष्य चौधरी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या नावांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणाऱ्या बिग बॉस १९ च्या प्रीमियरची आणि स्पर्धक यादीची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.